मुख्य बातम्या

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिक्रापुर (प्रतिनिधी) ‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न सुटणार हा देखावा असून, वास्तविक गेले पाच वर्ष नागरकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत आहे. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार आहे, असे चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे.

चंदन सोंडेकर हे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. श्री. सोंडेकर म्हणाले, ‘आमदारांनी आघाडी सरकार असताना शिरुर-हवेलीत मर्जीतील अधिकारी बसवले आहेत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धंदा चालू आहे. अनेक अधिकारी आमदारांच्या समन्वय समिती बैठकीत गैरहजर असतात. शिरूर तालुक्यात एजंट आणि पैसे दिल्याशिवाय प्रशासनात नागरीकांची कामेच होत नाहीत. केवायसी ऑनलाईन साधे रेशन कार्ड मिळत नाहीत. आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती झाली आहे.’

‘विरोधी पक्षात स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांची कमतरता निश्चितच जाणवत आहे. नागरीकांच्या हजारो तक्रारी प्रशासनात प्रलंबित आहेत. भुमी अभिलेख म्हणजे ज्याचे पैसे त्याची मोजणी, चर्तुसिमा त्याचा ताबा असा धंदा चालू आहे. महावितरण म्हणजे फक्त आमदारांच्या कार्यकर्त्यांनाच डीपी ती सुद्धा फक्त सणसवाडीतच. शिरुर हवेलीत 100 पैकी 99 गावात अंधार आहे. शिरूर तालुक्यात अनेक समस्या आहेत. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार असून, जनतेससाठी 24 चोवीस तास उपलब्ध राहणार आहे, असे श्री. सोंडकर यांनी म्हटले आहे.

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

शिरुर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार का…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago