क्राईम

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हुक तुटून पार्ट अंगावर पडल्याचे कंपनी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेत शिवबाबू कमलेश शाहू (वय २३, सध्या रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मनकापूर पोस्ट कुमिवाहा ता. मन्झहनपूर जि. कौसंबी उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत राजेश बुधानी शाहू (वय ३४, रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मनकापूर पोस्ट कुमिवाहा ता. मन्झहनपूर जि. कौसंबी उत्तरप्रदेश) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील झामील स्टील कंपनीमध्ये शिवबाबू शाहू हा क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पार्ट उचलत होत. पण, अचानक क्रेनचे हुक तुटून लोखंडी वजनदार पार्ट शिवबाबूच्या छातीवर पडला आणि शिवबाबू पाठीमागे असलेल्या पार्ट मध्ये अडकला. दरम्यान अन्य कामगारांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारा पूर्वीच शिवबाबूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी टोळी अखेर गजाआड, तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

शिरूरमध्ये एकाला लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 मिनिटे ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

11 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

11 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago