क्राईम

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये रात्रीस चाले ‘ड्रोनचा खेळ’; नागरिकांमध्ये भिती…

शिरूर (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील कान्हूर, मलठण, पाबळ, मिडगुलवाडी, वाघाळे या गावांसह विविध गावांमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांच्या टोळ्यांकडून चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या चर्चा देखील ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत. परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

एक चोरी झाली की दुसरी चोरी घडल्याची घटना समोर येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून हे ड्रोन नसल्याचे सांगत शिकाऊ विमान असल्याचा दाखला देत नागरिकांचे तोंड बंद केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात रात्रीस चोरट्यांकडून हा खेळ सुरू आहे. हे ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात, हे समजत नसल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलिस गावा गावात जाऊन गस्त घालत आहेत. परंतु, ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. हे ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा शोध घ्यावा, अशी मागणी आता ग्रामीण भागातील नागरिक करत आहे.

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये ड्रोन सदृश उपकरण फिरत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. ड्रोनद्वारे टेहळणी करून चोरी होत असल्याच्या चर्चा खोट्या आहेत. कोणीही गैरसमज अथवा अफवा पसरवू नयेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याबाबत तपास करण्यात येत आहे.
जोतीराम गुंजवटे, पोलिस निरीक्षक, शिरूर

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात कंपनीचे शटरचे लॉक तोडून ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर तालक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारावर चोरट्यांचा डल्ला…

शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…

शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago