मुख्य बातम्या

मयत व्यक्तीला अपत्य नसल्याचे कळताच महाराजांनी नाकारले मानधन

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांनी ‘मी ही त्यांच्या मुलाप्रमाणेच आहे असं समजा असं म्हणतं’ प्रवचनाच मानधन त्या कुटुंबाला परत करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

कारेगाव येथे शामराव मल्हारी शितोळे यांचं दहा दिवसांपुर्वी निधन झालं होत. त्यांच्या दशक्रिया विधिला शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांचं प्रवचन होत. प्रवचन झाल्यानंतर शामराव शितोळे यांना अपत्य नसल्याचे फरताळे महाराजांच्या लक्षात आले. त्यावेळेस ऐन दिवाळीत शितोळे यांच्या पत्नीला झालेलं दुःख पाहून फरताळे महाराजांनी प्रवचनाच ‘मानधन’ नाकारत ते मानधन शितोळे यांच्या पुतण्याकडे परत दिलं. विशेष म्हणजे कारेगावच्या ग्रामस्थांनी यावेळी चहा पिण्याचा आग्रह केला. त्यालाही फरताळे महाराजांनी नम्रपणे नकार दिला. यावेळी दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसह कारेगाव ग्रामस्थांनीही या गोष्टीचे कौतुक केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago