शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीवरील पुलाची गावातील युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु करत पुलाची स्वच्छता करुन पुलाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असताना पुन्हा येथे कचरा टाकण्यास सुरवात झालेली असल्याने आता गावातील युवकांनी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी करत कचरा न टाकण्याबाबत समज देण्यास सुरवात केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शंभर हून अधिक युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु केली. नुकतेच येथील पुलाची स्वच्छता करुन मोहिमेला सुरवात करण्यात आलेली आहे. युवकांनी येथील सर्व परिसर स्वच्छ करुन येथील पुलाची रंगरंगोटी करुन सुशोभीकरण करण्याचा देखील निर्णय घेतला. मात्र काही नागरिक दुचाकीहून येऊन पुलावरुन पिशवीतून कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे गावातील संतप्त युवकांनी सदर ठिकाणी पहारा लावत कचरा फेकणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी मार्गाने कचरा न टाकण्याबाबत समाज देण्यास सुरवात केली आहे तर कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारुन त्यातून मिळणारी रक्कम पुलाच्या सुशोभीकरणासाठी वापरण्याचा निर्णय देखील युवकांनी घेतला आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…