मुख्य बातम्या

रांजणगाव जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांचा तपास हास्यापद तर तपासी अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील ७२ गुंठे जमीन अपहारप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला तत्कालीन ग्रामसेवक व लिपिकाला पोलिसांनी अटक केलेली आहे. तपासा दरम्यान उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न करुन त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

रांजणगाव पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत लक्ष्मण चव्हाण यांनी तपासा दरम्यान दत्तात्रय पाचुंदकर यांच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतच्या दस्त ऐवजात बनावट नोंदी, खाडाखोड तसेच बनावट पान चिटकवत त्यावर नोंदी केल्याचे पोलिसांनी तपासात दाखवून दत्तात्रय पाचुंदकर यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

परंतु तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी पोलिस तपासा दरम्यान मला पोलिसांनी बऱ्याच कागदपत्रावर सहया करायला सांगितल्या होत्या. तसेच ते कागदपत्र मला वाचायला दिलेले नाहीत. पोलिस कोठडी दरम्यान मी कधीही दत्तात्रय पाचुंदकर यांच्या सांगण्यावरुन रांजणगाव गणपतीच्या ग्रामपंचायत दप्तरामध्ये खाडाखोड केल्याचा जबाब दिलेला नाही किंवा मी खाडाखोड केलेली नाही असे प्रतिज्ञापत्र शिरुर कोर्टात सादर केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असुन पोलिसांनी पाचुंदकर यांचे नाव या प्रकरणात गोवण्यासाठी केलेला तपास हास्यास्पद आहे.

ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी शिरुर कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने या प्रकरणात आणखी गुंतागुंत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांना या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव तर नाही ना…? अशी सगळीकडे सध्या दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर हे २००९ ते २०१९ या कार्यकाळात कधीही ग्रामपंचायतचे पदाधिकारी नसताना तपास अधिकारी अशोक चव्हाण यांनी सदर गुन्ह्यात त्यांना राजकीय दबावापोटी तर आरोपी केले नाही ना अशी सध्या सगळीकडे उलट सुलट चर्चा चालु आहे.याबाबत शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

6 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago