मुख्य बातम्या

गुनाट येथील विद्युत मोटारीच्या ७० किलो तांब्याच्या तारा चोरल्या

शिंदोडी (तेजस फडके) सध्या फेब्रुवारी महिना सुरु झाला असुन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शिरुरच्या पुर्व भागात गुनाट गावातील कोळपेवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मधील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या असुन याबाबत गुनाटचे माजी सरपंच गणेश बाळासो कोळपे (वय ३३) (रा. गुनाट, कोळपेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ८ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास चिंचणी गावच्या हददीत घोड धरणालगत असलेल्या गणेश कोळपे यांच्या मालकीच्या तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी असलेल्या ७ पाण्याच्या विद्युत मोटारी मधील ७० किलो ग्रॅम वजनाच्या ४२ हजाररुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरटयाने मोटारी खोलुन चोरुन नेल्या असुन अज्ञात चोरट्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आह.

 

या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद मोरे करत आहेत.

शिरुर तालुक्यातील अनाधिकृत सेंट चावरा स्कूलवर कारवाई करण्याची मागणी

शिरुरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार 

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

10 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

17 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

19 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

19 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

19 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago