shirur-parking
शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः पाचकंदील चौकातील कापड बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अधिकृत पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लहान-मोठ्या गाड्यांची गर्दी वाढत असून वाहतूक कोंडी हा दररोजचा नित्यक्रम झाला आहे.
HDFC बँकेने ग्राहकांसाठी पार्किंगची सोय केली असली, तरी तेथील रॅम्प बैलगाडा घाटापेक्षाही अधिक धोकादायक आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. प्रचंड चढ-उतार असलेल्या या रॅम्पवरून गाडी काढणे म्हणजे मोठे आव्हानच ठरत आहे. चारचाकी वाहनांसाठी तर हा रॅम्प थरारपटाची अनुभूती देणारा असल्याची उपहासगर्भ टीका होत आहे.
या समस्येच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी आणि मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. त्यांनी “HDFC बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आव्हान दिले आहे. या धोकादायक रॅम्पमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाचकंदिल चौकात एचडीएफसी बँकेच्या खाली पार्किंगच्या जागेत चक्क पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शिरूर शाखा शिफ्ट होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे तातडीने या भागातील बँका हलवण्याचे आवाहन परिसरातील व्यापाऱ्यांनी केले आहे.
गुनाट येथील विद्युत मोटारीच्या ७० किलो तांब्याच्या तारा चोरल्या
शिरूर तालुक्यातील हरहुन्नरी कलाकार सचिन शिंदे झळकणार मराठी चित्रपटात…
शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस
शिरूर तालुक्यातील RTI कार्यकर्त्याचा हत्येचा कट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला…
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…