शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात कैलासराव बोंबे यांच्याकडून सेवापूर्तीवेळी विद्यालयास देणगी, समाजापुढे उभा केला आदर्श

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता. शिरुर) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक कैलासराव बाजीराव बोंबे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास शिक्षणसंस्थेसाठी ७५ हजार रुपयांची रोख देणगी देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

कैलासराव बोंबे हे गेली ३८ वर्षे पिंपरखेड (ता.शिरूर) येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. आपल्या सेवेच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक व पारदर्शक कारभारामुळे त्यांना दोन वेळा आदर्श लिपिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आपल्या नोकरीबरोबरच त्यांचे पिंपरखेड गावच्या शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान असून या सेवापूर्ती वेळी त्यांची शिक्षण संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने गावातून ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध भेटवस्तू देत भव्य सत्कारही करण्यात आला. तसेच त्यांचे वडील बाजीराव बोंबे , आई राधाबाई ,पत्नी उल्का, मुलगा अमोल , कीर्ती , स्नुषा पूजा यांचा कौटुंबिक सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करणेत आला.

 

याप्रसंगी त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, तज्ञ संचालक पोपटराव थिटे , माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,अरुणा घोडे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे, माजी सरपंच भिवाजी बोंबे, प्रकाश गुजर, प्राचार्य रामदास मगर, आर.बी. गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य अप्पासाहेब शेळके, बबनराव बोंबे, प्रफुल्ल बोंबे, वैभव उंडे यांचेसह ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण ढोमे व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी कार्यक्रमासाठी परिसरातील विविध गावचे सरपंच , उपसरपंच , सहकारी सोसायटीचे पदाधिकारी , विविध शिक्षणसंस्थांचे प्राचार्य , आजी माजी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , ग्रामस्थ ,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.एन.पंचरास , एस.आर.बराटे यांनी केले. आभार माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

8 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

8 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

8 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

8 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

8 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

8 तास ago