मुख्य बातम्या

Video: एकाच दिवशी नऊ अनधिकृत बांधकामावर पीएमआरडी चा हातोडा

वाघोली (तेजस फडके): केसनंद गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागा मार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे अशी एकूण १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे पाडण्यात आली आहेत.

या अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. हि बांधकामे पडण्याची कारवाई पाच पोकलेन मशिनच्या सहाय्याने करण्यात आली. या कारवाईच्या वेळी पीएमआरडीए चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. PMRDA च्या परवानगी शिवाय कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये असे आवाहन नियंत्रक तथा अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त बन्सी गवळी यांनी केले आहे. अनधिकृत बांधकाम धारकाकडून अनधिकृत बांधकाम पाडण्याचा खर्च वसूल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

२८ जानेवारी २०२० साली केसनंद येथील गट नंबर १०१ आणि १०२ येथे PMRDA ने अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला होता. या ठिकाणी काही राजकीय व्यक्तींनी बेकायदेशीर प्लॉटिंग करुन अनधिकृतरीत्या बांधकाम केले होते. दरम्यानच्या कालखंडात महसूलमंत्री, नगरविकासमंत्री, गृहमंत्री, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुंबई उच्च न्यायालय, पुणे न्यायालय, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभाग (IG) यांच्याकडे न्यायासाठी दावे दाखल केलेले आहेत. तसेच राज्याच्या विधानपरिषदेत सुद्धा याबाबत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नियम ९३ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

या जमिनीचे मूळ मालक महादू गंगाराम कोल्हे (माळी) हे आणि त्यांचे वंशज केसनंद येथील गट क्रमांक १०१ आणि १०२ जुना गट नंबर १०० अ/ब सर्वे नंबर १६४/१६५ मध्ये ६५ एकर क्षेत्र असुन या जागेचे मूळ मालक गंगाराम लाडू माळी (कोल्हे) असुन त्यांचे वारस म्हणुन महादू गंगाराम माळी (कोल्हे) यांचे नाव दाखल आहे. सन १९३०-३१ साली गाव नमुना नंबर ७/१२ तयार होताना गट नंबर १६४/१६५ चे कबजेदार म्हणुन निम्या हिश्यात चुनीलाल लछिराम मारवाडी नाव लागले. याचा फेरफार क्रमांक २०२३ चे अवलोकन केले असता. चुनीलाल मारवाडी यांनी पर्वता माळी यांच्याकडुन सन १९४३ साली निम्मे क्षेत्र खरेदी केल्याचे दिसते. परंतु उर्वरित १/२ हिस्सा चुनीलाल मारवाडी यांच्या नावे कसा झाला याबाबतचे अभिलेख आढळुन येत नाही.

त्यानंतर वेगवेगळ्या फेरफारा अन्वये, वारसाने आणि खरेदीचे व्यवहार होऊन सन २०१५-१६ च्या ७/१२ वर नसरुद्दीन महंमदभाई सोमजी आणि इतर २४ जणांची नावे दाखल झालेली दिसत आहेत. त्यामुळे महादू माळी (कोल्हे) यांच्या मूळ वारसांनी तोतया नावे लावुन विक्री केलेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली असून गुरुवारी (ता. ३०) रोजी PMRDA ने केसनंद येथील गट क्रमांक १०१/१०२ या जागेतील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामावर कारवाई करत त्या ठिकाणच्या १०४५० स्क्वेअर फुटाची ९ बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

याबाबत या जागेचे मूळ मालक अविनाश गंगाराम कोल्हे आणि संतोष बाळू कोल्हे व इतर यांनी गट क्रमांक १०१/१०२ मधील अनधिकृत प्लॉटिंग खरेदी करु नये तसेच या अनधिकृत प्लॉट वर अनधिकृत बांधकाम करु नये असे आवाहन केले असुन सदरच्या नुकसानीस मूळ मालक जबाबदार असणार नाही असे “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

51 मि. ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

9 तास ago

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

1 दिवस ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

1 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

3 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

3 दिवस ago