theft
शिक्रापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शैलेश मासळकर यांचे संतोष इलेक्ट्रोनिक नावाने इलेक्ट्रोनिक मोटार विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. ३० जून रोजी रात्री १ वाजेपर्यंत मासळकर यांनी दुकानात काम केले त्यानंतर दुकान बंद करुन घरी गेले. सकाळच्या सुमारास मासळकर दुकानात आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानात आत जाऊन पाहणी केली असता दुकानातील विद्युत मोटार, तांब्याच्या वायर, ग्रँडर मशीन, कटर मशीन यांसह आदी साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत शैलेश भिवाजी मासळकर (वय ३५) रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भरत कोळी हे करत आहे.
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…