शिरुर संवादिनी तर्फे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ शाळेत ‘ओळख स्पर्शाची’ हा स्तुत्य उपक्रम

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) आज (दि २) रोजी शिरुर येथील बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शाळेत ‘ज्ञानप्रबोधिनी प्रस्तुत’ ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम इयत्ता १ ली ते ७ वी च्या शालेय मुलांना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव जागृती व्हावी यासाठी राबविण्यात आला.

 

सध्या देशात व राज्यात समाजातील काही विकृत लोकांकडुन लहान मुलींबाबत लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना चांगला स्पर्श वाईट स्पर्श याचे अजिबात ज्ञान नसते. त्यामुळे या मुली अन्यायाला बळी पडत आहेत.

 

या दुर्दैवी घटना कुठे तरी थांबाव्यात आणि शालेय विद्यार्थ्यांना वाईट स्पर्श ओळखता येऊन त्याला विरोध करता यावा. तसेच चांगला स्पर्श कोणता हे पण समजावे म्हणुन ‘शिरुर संवादिनी टीम’ ने जुन २०२४ ते आजपर्यंत ३३३६ विद्यार्थांसाठी ओळख स्पर्शाची हा उपक्रम राबविला आहे. यातुन मुलांना चांगला स्पर्श,वाईट स्पर्श समजत आहे.

 

शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत जाऊन हा उपक्रम राबवण्याचा ‘शिरुर संवादिनी टीम’ चा मानस आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० च्या विद्यार्थांना उमलत्या वयोगटाशी जुळउन घेताना हा उपक्रम राबविला जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल पहायला मिळत आहे.

 

शिरुर संवादिनी टिम चे सध्या तालुक्यातील अनेक शाळात काम कौतुकास्पद चालू आहे. आज (दि २) रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळेत डॉ स्मिता बोरा, डॉ सोनाली हारदे, रोहिणी जावळे, शिल्पा घोडे, राणी कर्डिले, निर्मला गाडीलकर, शीतल बोरा, नूतन क्षीरसागर यांनी हा उपक्रम राबविला.

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या न झाल्यास उपोषण

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तीन भावंडांनी शाळेसाठी केली लाखों रुपयांची जमीन दान