आरोग्य

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्य आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून भारतात अनेक उपचारांसाठी केला जातो. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं, याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे.

जास्तीत जास्त लोक जेवण करताना पाणी पिण्याची एक चूक करतात. अनेकजण जेवण करता करता पाणी पितात. काही जण जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. मात्र, आयुर्वेदानुसार, जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी फारच घातक आहे. जेवण करताना पाणी पिणं किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणं किती घातक असतं.

जेवताना पाणी पिण्याचे नुकसान?
जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो. याने पचनक्रियेवर प्रभाव पडतो. जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते. याने पोटाचे विकार होतात.

आपण जे खातो त्यावर जठारात पचनक्रिया होते. जठराग्नी ही खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नी ही पचनक्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

जेवताना पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते. ही जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. त्याने एक दुष्टचक्र सुरू होते. महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात.

जेवताना पाणी पिण्याच्या टिप्स
1) आयुर्वेदात सांगितलं आहे की, जेवणाआधी कोमट पाण्याचे काही घोट प्यावे. याने डायजेस्टिव सिस्टीम अक्टिव होते आणि जठराग्नी तयार होते. यामुळे पचनक्रिया चांगली होते.
2) जेवणात कोमट पाण्याचे छोटे घोट घेतल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि अॅसिडही वाढत नाही. जेवताना थंड पाणी टाळा. याने जठराग्नी विझते.
3) आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर पाणी पिण्यासाठी साधारण 30 मिनिटे थांबावे. याने पचनक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय होते.
4) जेवण केल्यावर लगेच पाणी प्याल तर याने पचनक्रिया प्रभावित होते. ज्यामुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पोटात अ‍ॅसिड वाढण्याची समस्या होऊ शकते.

या गोष्टींची घ्या काळजी
1) जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे.
2) जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही. जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं.
३) तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे.

योग्यवेळी पाणी पिण्याचे फायदे
– जेवण केल्यावर एक तासांनंतर पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं.
– योग्यवेळी पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली राहते.
– पोटात गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होत नाही.
– शरीरात अन्नातील पोषक तत्व चांगल्याप्रकारे शोषूण घेतं.
– याने झोपली चांगली लागते.

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

2 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

2 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

2 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

18 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

20 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago