मुख्य बातम्या

मंगलदास बांदल आज काय बोलणार?

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले असताना त्यांनी आज २६ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित केली असून बांदल काय बोलणार याकडे पुणे जिल्हयासह शिरुर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल एका बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल बावीस महिने कारागृहात होते, ते नुकतेच कारागृहाबाहेर आलेले असून त्यांनी लगेचच मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे, तर यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर असताना वरिष्टांकडून एक पत्र काढून त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती त्यांनतर बांदल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसताना अचानक कारागृहात गेले होते.

सध्या बांदल हे कारागृहातून बाहेर आल्यानंतर लगेचच कामाला लागले आहे. बांदल कधीही कोणत्याही निवडणुकीत काहीही करु शकतात अशी स्थिती आहे, तर अनेकदा बहुमत नसताना देखील त्यांनी सत्ता घडवलेली असल्याने बांदल काय करतील हा अंदाज कोणालाही नाही, मंगलदास बांदल यांनी रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरुर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून आता बांदल काय गौप्यस्फोट करणार, काय राजकारणात काय भूमिका घेणार आणि राजकारणातील कोणती रणनीती आखणार किंवा कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार तसेच पुढील निवडणुकांना कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

5 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago