शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत तब्बल ३३ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करत शिरूर पोलिसांनी तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला न्यायालयाने ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात फिर्यादी विकास भिमराव नागरगोजे (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी शिरूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, निशा लक्ष्मण शिंदे (रा. इंदापूर, जि. पुणे) हिने ऑगस्ट २०२३ पासून फिर्यादी व त्यांच्या ओळखीतील लोकांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. “वरपर्यंत ओळखी आहेत” असे सांगून, फिर्यादी यांच्याकडून २३.४६ लाख रुपये बँकेतून आणि १० लाख रुपये रोख स्वरूपात, एकूण ३३.४६ लाख रुपये उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन तत्काळ तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर व महिला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे निशा शिंदे ही इंदापुर येथे असल्याचे शोधून काढले.त्यावर पोलिसांनी इंदापुर येथे धाड टाकून निशा शिंदे हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर आणि पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर कोणीही या फसवणूक प्रकरणात सामील आहेत का, याची चौकशी केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…