शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतातील वादातून महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धुरपाबाई देवराम शिंदे (वय ६०, रा. हिलाळ वस्ती, कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. धुरपाबाई शिंदे या आपल्या जाऊ सुशिला दत्तात्रय शिंदे व शोभा विनायक शिंदे यांच्यासह शेतात काम करुन घरी जात असताना वाद निर्माण झाला.
दरम्यान, फिर्यादींच्या शेत गट नं. १६३१/१ मध्ये आरोपी हरीदास मुलमुले यांनी आपली गुरे बांधली होती. याबाबत फिर्यादींनी हरकत घेतल्यावर त्याचा मुलगा सुरज हरीदास मुलमुले याने उर्मटपणे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सुरज, संगीता, बाळु, संग्राम व पमा मुलमुले या पाच जणांनी धावत येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. आरोपी संगीता हिने फिर्यादींचे केस पकडून गळा दाबला व जमिनीवर पाडले, तसेच सर्वांनी मिळून हातांनी मारहाण केली व धमकावले.
या घटनेनंतर शिंदे यांनी शिरुर पोलिसांत तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अरुण उबाळे हे करीत आहे.ग्रामस्थांत या घटनेने एकच खळबळ उडाली असून, शेतातील वाद आता मारहाणीपर्यंत पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.
Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक
गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…