आरोग्य

१० ऑगस्ट म्हणजेच डेंग्यू प्रतिबंधक दिवस

पावसाळा सुरु झाला की विविध किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात.पावसाळ्याच्या हंगामात बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्टला ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो.

डेंग्यू हा आजार व्हायरसमुळे होतो, यालाच “डेन व्हायरस” देखील म्हंटले जाते. डेंग्यू हा आजार ‘एडिस’ नावाच्या डासापासून होतो. या डासाच्याही दोन प्रजाती आहेत, एडीस इजिप्ताय आणि एडीस एल्बोपेक्टस. पावसाळ्यात ज्या ठिकाणी नेहमी पाणी साचते त्या ठिकाणी ‘एडीस’ सारख्या डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, म्हणून आपण ज्या परिसरात राहतो तेथे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला डेंग्यू पासून काही धोका निर्माण होणार नाही.

डेंग्यू लक्षणे
सर्दी, खोकला, सांधेदुखी, तीव्र ताप येणे. मळमळणं आणि उलट्या, पोट दुखणे, त्वचेवर व्रण उठणं.

डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी टिप्स
१) साचलेलं पाणी बदलावं: कुलर, बादली आणि इतर भांड्यांमधील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा बदलावं. डेंग्यूचे डास साचलेल्या चांगल्या पाण्यामध्येही वाढतात. जर आपल्या घरात असं साचलेलं पाणी असेल तर डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी पाणी बदलण्यासोबत, पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे.

२) आपले हात-पाय झाकून ठेवावेत: डेंग्यूच्या प्रसरणाचा सर्वात मोठा ऋतू म्हणजे पावसाळा. सर्वांनी असेच कपडे घालावेत ज्यानं आपले हात-पाय झाकले जातील आणि डासांना चावण्यासाठी जागा मिळणार नाही. तसंच डासांपासून बचाव करण्यासाठीचं क्रीमही आपल्या त्वचेवर लावणं उत्तम.

३) रात्री मच्छरदाणीचा वापर करावा: रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरात डासांना पळवणाऱ्या स्प्रेचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मात्र, ज्यांना असा स्प्रे वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांनी मच्छरदाणीचा वापर करणं जास्त चांगलं आहे

४) ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा: घरात नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा. मात्र, पावसाळ्यात हे करणं अगदी आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात डेंग्यू पासून रक्षण करण्यासाठी डासांची ओल्या कचऱ्यामध्ये होणारी वाढ आपल्याला रोखता येईल.

५) रुग्णांना सुरक्षित आणि मोकळं ठेवावं: डेंग्यू पासून बचाव करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं डेंग्यू झालेल्या रुग्णाची काळजी घेणं होय. जर घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याला चावलेला डास इतर कुणालाही चावू शकतो आणि त्यामुळं डेंग्यू पसरू शकतो, म्हणून रुग्णाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

3 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

3 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

19 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

19 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

19 तास ago