आरोग्य

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक तत्व हवी असतात. जेणेकरून तो आपलं काम योग्यपणे करू शकेल. जर मेंदुला आवश्यक ते पोषक तत्व मिळाले तर मेंदू अ‍ॅक्टिवही राहील आणि स्मरणशक्ती देखील मजबूत होईल. अशात काही फूड्सचा आहारात समावेश करायला हवा. या फूड्सच्या मदतीनं स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते आणि वाढत्या वयातही मेंदू चांगलं काम करतो. चला तर पाहुयात कोणते फूड्स मेंदुसाठी फायदेशीर असतात.

ब्लूबेरी हे फळ दिसायला जरी लहान असलं तरी खूप गुणकारी आहे. ब्लूबेरीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट असतात, जे मेंदुचा कोणत्याही प्रकारच्या डॅमेजपासून बचाव करतात. तसेच यानं स्मरणशक्तीही खूप वाढते. आठवडाभर काही ब्लूबेरी खाल्ल्यास मेंदू हेल्दी राहण्यास मदत मिळते.

संत्री मेंदुसाठी फायदेशीर फूड्सच्या यादीत संत्री हे फळ सुद्धा येतं. यातील व्हिटामिन सी मुळे मेंदुचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. स्मरणशक्ती वाडते आणि फोकसही वाढतो.

हळद हळदीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण भरपूर असतात. तसेच यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्सही असतात. त्यातील एक म्हणजे करक्यूमिन आहे. यानं सूज कमी होते, मूड चांगला राहतो आणि स्मरणशक्ती वाढते.

भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात मॅग्नेशिअम, झिंक आणि आयर्न भरपूर असतं. या गोष्टी मेंदुच्या कामकाजासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यांनी स्मरणशक्तीही वाढते.

डार्क चॉकलेट चॉकलेट खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण इतर कोणत्याही चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यात फ्लेवोनॉइड्स आणि कॅफीन असतं. ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि स्ट्रेस कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

17 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

2 दिवस ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

3 दिवस ago