आरोग्य

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी चवीला एकदम मस्त असते. फार प्रसिद्ध आहे तसेच घरी केलेल्या साजूक तुपासोबत ही पोळी खाल्ली जाते. तसेच त्यासोबत कटाची आमटी असतेच. मात्र आणखी एक पदार्थ केला जातो. तो म्हणजे नारळाचे दूध. पुरणपोळी या नारळाच्या दुधात बुडवून खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. हे नारळाचे दूध फक्त चवीला छान नसते तर आरोग्यासाठीही फार चांगले असते.

नारळाचे दूध पचनासाठी फार चांगले असते. या दुधात अॅण्टी बॅक्टेरियल सत्व असतात. तसेच कॅल्शिअम असते. लोह भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम असते. जीवनसत्त्व ‘सी’, ‘ई’, ‘बी’ यांचे प्रमाणही भरपूर असते. आतड्यांच्या आरोग्यासाठी हे दूध फायद्याचे ठरते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. काही जणांना गायीचे दूध पचत नाही. त्यांच्यासाठी बदामाच्या दुधाप्रमाणे हा ही एक पर्याय आहे. या दुधाचा अजिबात त्रास होणार नाही.

त्वचेसाठी नारळाचे दूध अगदी उत्तम. त्वचा मऊ-मुलायम होते. त्वचेवरील डाग तसेच पिंपल्स, मुरुम आदी कमी होण्यासाठी या दुधाचा फायदा होतो. हे दूध प्यायल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्वचेला गरजेची असलेली आर्द्रता या दुधातून मिळते. केसांसाठी तर एकदम प्रभावी असा पदार्थ आहे. नारळ मुळातच केसांसाठी छान असतो. त्यामुळे नारळाचे दूध नियमित प्यायल्याने केस मऊ, मजबूत आणि दाट होतात.

नारळाच्या दुधाचा असा एक उपयोग आहे जो फार कोणाला माहिती नाही. अनेकांना पित्ताचा फार त्रास असतो. सतत उलट्या होतात, डोकं दुखतं. ज्यांना असे पित्त होते त्यांच्यासाठी नारळाचे दूध औषधी आहे. पित्ताचे प्रमाण कमी करुन पोटाला थंडावा देण्याचे काम हे दूध करते. नारळाचे दूध घ्यायचे आणि त्यात थोडा गूळ घालायचा. हे मिश्रण चवीला एकदम मस्त लागते. तसेच त्याचा आरोग्यासाठी फायदाही होतो. नारळाचे दूध चवीला छान असतेच आणि आरोग्यासाठीही फार फायद्याचे असते. त्यामुळे या पदार्थाचा आहारात नक्कीच समावेश करावा. पण अति प्रमाणात नारळाचा दूध पिऊ नका. त्याचा उलटा परिणाम होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

17 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

2 दिवस ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

3 दिवस ago