आरोग्य

नेहमीच्या खाण्यातील ५ पदार्थामुळे होतो जीवघेणा कॅन्सर

सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. चवीच्या नावाखाली लोक असे पदार्थ खातात जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांच्यामते आपल्या आहारातील काही ठराविक पदार्थ थेट कॅन्सरच्या धोक्याशी जोडलेले आहेत. जे हळहळू शरीरात टॉक्सिन्स वाढवून कॅन्सरचा धोका निर्माण करतात. रोजच्या आहारातील कोणते पदार्थ कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात समजून घेऊ.

१) रिफाईंन शुगर आणि गोड पेय

साखर ही अधुनिक काळातील स्लो पॉयझन मानले जाते. साखरेच्या अतिसेवनानं शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ शकते. साखरेमुळे येणारा लठ्ठपणा हा कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. साखरयुक्त पेयांच्या अतिसेवनानं पॅनक्रियाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

२) रिफाइंड कार्बोहायड्रेट्स

मैदा तयार करताना त्यातील सर्व फायबर्स काढून टाकले जातात आणि तो पांढरा करण्यासाठी ऑलॉक्सॉन सारख्या रसायनांचा वापर केला जातो. मैद्याच्या अतिसेवनानं रक्तातील साखर अचानक वाढते. ज्यामुळे शरीरात दीर्घकालीन सूज तयार होते.

३) ट्रास फॅट्स

बाहेरचे तळलेले पदार्थ एकाच तेलात वारंवार तळले जातात. तेल वारंवार उकळल्यामुळे त्यात एक्रिलामाईड नावाचे घातक रसायन तयार होते. फूड एण्ड एग्रीकल्चर ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार उच्च तापमानाला गरम केलेल्या पिष्टमय पदार्थांमध्ये एक्रिलामाईड तयार होते जे कार्सिनोजेनिक मानले जाते.

४) अल्ट्रा प्रोसेस्ड फूड

चिप्स, इन्संट नुडल्स, बिस्किटं आणि पॅक केलेले ज्यूस यामध्ये चव वाढवण्यासाठी कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हज वापरले जातात, एका अभ्यासानुसार पॅकेटमधील अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या १० टक्के वाढीमुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर कॅन्सरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो.

५) अति गरम पेय

अनेकांना वाफावळलेला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण अति गरम पेय आपल्या अन्ननलिकेतील नाजूक आवरणाला इजा पोहोचवतात. इंटरनॅ्रशनल एजन्सी ऑन कॅन्सरनं ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेयांना प्रोबॅबल कार्सिनोजन म्हणून घोषित केलं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago