आरोग्य

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ६ स्वस्त पदार्थ, आहार सुधारा तुमचं हार्ट दगा देणार नाही…

कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जी वाढल्याने आपल्या शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होतात. कोलेस्टेरॉल हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण करणारा महत्त्वाचा घटक असल्याने ते वाढू न देणे आवश्यक असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा येतो

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात. कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर काही नॅचरल उपायांनी देखील ही समस्या दूर केली जाऊ शकते. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण कोणत्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो ते पाहूयात.

1) मोरिंगा: मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांचा पाला. डॉ. हंसाजी यांच्या मते, अनेक रिसर्चचे निकाल असे दर्शवतात की, मोरिंगा खराब कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. मोरिंगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करते. याशिवाय, मोरिंगाच्या पानांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. त्यात फायटोस्टेरॉल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे कोलेस्टेरॉल शोषण रोखतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची (HDL) पातळी वाढवतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मोरिंगा पावडर मिसळून पिऊ शकता.

२) कोथिंबीर: कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोथिंबीरच्या पानांना सुपरफूड मानले जाते. कोथिंबीरच्या पानांमध्ये काही घटक असतात जे पित्त आम्लाचा स्राव वाढवतात. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही कोथिंबीरची पाने पाण्यासोबत बारीक करून पिऊ शकता किंवा कोथिंबीरची पाने, सफरचंद आणि आल्याचे तुकडे घालून स्मूदी बनवून पिऊ शकता.

३) तुळशीची पाने: तुळशीची पाने कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील नसांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतात. याशिवाय, तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल असते, जे स्ट्रेस कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. यासाठी एक ग्लास पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने घाला आणि काही वेळ तसेच राहू द्या. तुम्ही हे पाणी दररोज झोपण्यापूर्वी कोमट करुन पिऊ शकता.

४) दुधी भोपळा: दुधी भोपळा शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. भोपळ्यामध्ये फायबर असते जे रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासाठी, मिक्सरमध्ये भोपळ्याचे तुकडे, थोडे आले, जिरे आणि पाणी घालून स्मूदी बनवा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्या. या उपायामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.

५) मेथीचे दाणे: मेथीच्या बियांमध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणावर असते. मेथीच्या दाण्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. याशिवाय, मेथीचे दाणे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिऊ शकता.

६) गव्हांकुर: गव्हांकुर म्हणजेच व्हीटग्रास. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी गव्हांकुराचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरते. गव्हांकुर लिव्हरचे कार्य सुधारण्यास आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यासाठी, एक ग्लास पाण्यात मूठभर गव्हांकुर घालून ते एकत्रित मिक्सरला फिरवून त्याचा रस तयार करून घ्यावा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा रस प्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

15 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

15 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

15 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

15 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

20 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

20 तास ago