आरोग्य

९०% लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात

बाजारात टरबूज दिसू लागले की उन्हाळ्याची जाणीव व्हायला लागते. उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतच मिळणारं हे फळ अनेकांच्या आवडीचं.

उन्हाळ्याचा त्रास सुसह्य करण्यासाठी टरबूज खाणं अत्यंत फायदेशीरही मानलं जातं. पण ते खात असताना तुम्ही काही चुका तर करत नाही ना हे एकदा तपासून पाहा कारण तज्ञांच्या मध्ये ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात आणि त्यामुळे मग वेगवेगळे आजार होतात.

याविषयीची पोस्ट आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की कधीही उपाशीपोटी टरबूज खाऊ नका. कारण त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. यामुळे मग गॅसेस होणे, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

जेवण झाल्यानंतर किंवा अगदी भरपेट नाश्ता केल्यानंतर लगेचच टरबूज खाणं टाळावं. कारण त्यामुळे पोट फुगल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळेच जेवण झाल्यानंतर कमीत कमी एखाद्या तासाने टरबूज खायला हवं.

फ्रिजमधून बाहेर काढलेलं टरबूज लगेच खाऊ नका. यामुळे सर्दी, शिंका येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे टरबुजाला आधी थोडं सामान्य तापमानावर येऊ द्या आणि त्यानंतरच ते खा.

टरबुजावर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना असते. पण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरातले सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोकाही असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

15 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

15 तास ago