आरोग्य

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर

आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास फुप्फुसांची आतून सफाई होईल.

फुप्फुसाच्या सफाईसाठी खास ड्रिंक

मध: मधात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण असतात, जे फुप्फुसांचा इन्फेक्शनपासून बचाव करतात.

लिंबू: लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे एक अ‍ॅंटी ऑक्सिडेंट आहे आणि फुप्फुसाला यापासून अनेक फायदे मिळतात.

आले:आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे फुप्फुसावरील सूज कमी करण्यास मदत करतात.

हळद: हळदीमध्ये करक्यूमिन असतं. हे एक अ‍ॅंटी ऑक्सिडेंटसारखं काम करतं. ज्यानं फुप्फुसाची सफाई करण्यास मदत मिळते.

कसं बनवाल आणि प्याल

एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चतुर्थांश चमचा हळद पावडर टाका. हे चांगलं मिक्स करा आणि हळूहळू प्या. हे खास ड्रिंक तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.

कसा मिळतो फायदा

कोमट पाण्यात मिक्स केलेल्या या गोष्टींमुळे फुप्फुसांमध्ये जमा विषारी तत्व किंवा कफ सहजपणे बाहेर पडतात. मध आणि लिंबानं फुप्फुसाचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर आले आणि हळदीनं सूज कमी होते.

इतरही फायदे

वरील गोष्टी कोमट पाण्यात टाकून नियमितपणे प्यायल्यानं केवळ फुप्फुसं आतून साफ होतात असं नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. या ड्रिंकनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, पचन तंत्र मजबूत होतं आणि त्वचाही हेल्दी होते. फुप्फुसं साफ आणि हेल्दी ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मध, लिंबू, आले आणि हळद मिक्स पिणं एक प्रभावी आणि नॅचरल उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago