क्राईम

शिरूर तालुक्यात घर बंद असताना घरफोडी, तब्बल पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांबे वस्ती, न्हावरे येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संकेत बाजीराव साठे (वय 30, व्यवसाय – शेती, रा. तांबे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत, त्यांच्या घराचे पुढील दरवाजाला कुलूप लावलेले असताना, आरोपी अर्जुन बबन राठोड (रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलढाणा) व करण विनोद चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी पाठीमागील खिडकीवरून घरात प्रवेश करून चोरी केली.

या चोरट्यांनी घरातील छतावरून आत प्रवेश करत 1,50,000 रुपयांची रोख रक्कम (500 रुपयांच्या 300 नोटा), 1,20,000 रुपये किंमतीची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याची गणपती मूर्ती, तसेच 10,000 रुपये किंमतीचा मुलांचा पैसे साठवण्याचा डब्बा, आणि आई साधना बाजीराव साठे यांच्या नावाची एफ.डी.ची कागदपत्रे असा एकूण 2,80,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक फौजदार रमेश कदम यांनी गुन्हा नोंदवला असून, पोलिस हवालदार दिपक पवार हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

10 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

10 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

10 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

10 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

10 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

10 तास ago