आरोग्य

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे

गुळाला साखरेसारखं रिफाइन केलं जात नाही. ज्यामुळे त्यात अनेक पोषक तत्व कायम राहतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्याने थंडीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं कराव.

१) मसल्स मजबूत होतात

हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न असतं. आयर्न हेल्दी ब्लड सेल्सला सपोर्ट करण्यात मदत करतं. याने तुमचा थकवा दूर होईल आणि मांसपेशी मजबूत होतील.

२) एनीमियापासून बचाव

शरीरात आयर्नची कमतरता झाली की, एमीनियाचा धोका वाढतो. ज्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे गूळ आयर्नचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. याचा नियमित आहारात समावेश केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो.

३) आजारांचा धोका कमी होतो 

हिवाळ्यातील तुमच्या रोजच्या आहारात गुळाचा समावेश करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. यात ॲट ऑक्सिडेंट आणि फेनोलिक ॲसिड असतं, ज्यामुळे शरीरावर ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी पडतो.

४) पचन तंत्र चांगलं राहत

पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. बरेच बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे गुळाचं सेवन करतात.

५) इम्यूनिटी वाढते  

गुळाचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. गुळात असलेल्या पोषक तत्व आणि ॲटी ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. अशात अनेक जुन्या आजारांना रोखलं जाऊ शकतं.

कसं कराल गुळाचं सेवन

गूळ तुम्ही थेटही खाऊ शकता. जर तुम्हाला थेट गूळ खाणं आवडत नसेल तर याचे गूळ आणि तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही बनवू शकता. तुम्ही रोज २५ ग्रॅम गुळाचं सेवन करू शकता. जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गुळाच्या चहाचं सेवन करतात. महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त गूळ खाल्ल्याने तुम्हाला जुलाब लागू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago