सध्या केसगळतीच्या समस्येपासून अनेक जण त्रस्त आहेत. याचे सर्वात मोठे कारण पुरेसा आहार न घेणे आणि प्रदूषित वातावरणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो.
केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो. ज्याचा आपल्याला केसांवर परिणाम होतो आणि केस वाढण्याऐवजी केसगळती सुरु होते.
आयुर्वेदानुसार केसगळती रोखण्यासाठी भृंगराज हे वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात. जे शरीराला हानिकारक घटकांपासून संरक्षण देतात. ज्याचा उपयोग केसगळती रोखण्यासाठी होतो.
केसगळती रोखण्यासाठी भृंगराज पावडरमध्ये दही, आवळा पावडर आणि कोरफडीचा गर घालून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. दीड तासानंतर केस हर्बल शॅम्पूने केस धुवा.
भृंगराज पावडर नारळाच्या तेलात मिसळा. रात्री किंवा शॅम्पू करण्यापूर्वी दोन तास आधी टाळू आणि केसांना लावा. हे तेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने चांगला परिणाम मिळतो.
भृंगराजची पाने पाण्यात उकळून केस धुवू शकता. हे पाणी स्प्रे बाटलीत साठवून ठेवा. केस धुण्यापूर्वी दोन तास आधी कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. याचा चांगला परिणाम मिळेल.
भृंगराज तेल बनवण्यासाठी नारळाच्या तेलात भृंगराजची पाने घाला आणि १० ते १५ मिनिटे शिजवा.आठवड्यातून दोनदा या तेलाने टाळूला मालिश करा. दोन तासांनी केस धुवा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…