आरोग्य

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्या संबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण खाणं अनेकांना अवघड जातं. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कच्च्या लसणाऐवजी कसा खावा याबाबत आम्ही सांगणार आहोत.

लसणातील पोषक तत्व 

लसणांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतं. लसणांमध्ये सेलेनियम आढळतं. तसेच यात फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर यात अ‍ॅंंटी एजिंग गुणही असतात. ज्यामुळे त्वचा तरूण आणि चमकदार दिसते. लसणामधील अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी गुण शरीरात होणारी वेदना कमी करतात.

लसणाचे आरोग्याला होणारे फायदे

लसूण नियमितपणे खाल्ल्यास पचनासाठी आवश्यक तत्व वाढतात आणि पचन चांगलं होतं. लसणामुळे भूक वाढते. लसूण खाल्ल्यानं पोटात ॲसिड बनत नाही आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल टॉयलेटमध्ये खूप वेळ बसावं लागत असेल तर लसणानं ही समस्या दूर होते. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लसणामुळे हृदयासंबंधी अनेक आजारांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर लसणामुळे शुगर कंट्रोल होते. तसेच शरीरातील अनेक विषारी तत्व बाहेर पडतात.

लसूण भाजून खाण्याचे फायदे

जर तुम्हाला कच्चा लसूण खाणं अवघड जात असेल किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लसूण खाऊ शकता. लसणाच्या काही कळ्या तूपात भाजून खाल्ल्यास बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास अधिक मदत मिळते. तसेच लसूण तूपामध्ये भाजून खाल्ल्यास इम्यूनिटी बूस्ट होते. लसूण तूपात भाजून खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

18 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

18 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

18 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

18 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

18 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago