आरोग्य

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे

दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ सांगतात, दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करतात. तसेच, दालचिनी मधील वाईट जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म दह्याच्या सुखदायक प्रभावांसह एकत्रितपणे त्वचेचा संपूर्ण पोत सुधारण्यास मदत करू शकतो. परंतु, हे कार्य कसे घडते हे समजून घेणे आणि त्याप्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मनप्रीत कौर पॉल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. कौर या फरीदाबाद क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये कार्यकारी पोषणतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे

रक्तशर्करेवर नियंत्रण: मधुमेह असलेल्या किंवा मधुमेह होण्याचा धोका असलेल्या स्त्रियांसाठी दही आणि दालचिनीचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि दह्यातील प्रो-बायोटिक्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात, असे मनप्रीत यांनी सांगितले.

इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा: स्त्रियांसाठी, विशेषत: ज्यांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)चा त्रास आहे, त्यांना इन्सुलिन संवेदनशीलता सुधारणे अत्यावश्यक आहे. दालचिनी इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्यात मदत करू शकते; ज्यामुळे पीसीओएसची लक्षणे नियंत्रित करण्यात आणि मासिक पाळीचे नियमन करण्यात मदत होऊ शकते.

दाहकता विरोधी गुणधर्म: दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्यास बऱ्याच काळापासून दाहकतेचा त्रास होत असेल तर पीसीओएस सारख्या परिस्थितींमध्ये कारणीभूत ठरणाऱ्या हार्मोनल कार्याच अडथळा आणू शकते आणि मासिक पाळीचे नियमन करण्यास देखील मदत करते. दालचिनीमध्ये दाहकता विरोधी गुणधर्म आहेत, जे दाहकता कमी करण्यास आणि संपूर्ण हार्मोनल आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात, असे मनप्रीत यांनी सांगितले.

अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म: दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावा पासून वाचवू शकतात. ऑक्सिडेटिव्ह ताण हार्मोनच्या उत्पादन आणि संतुलनावर नकारात्मक परिणाम करू शकतो. पण, संयम महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजांसाठी ते योग्य आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम आहे, असे मनप्रीत यांनी स्पष्ट केले.

दालचिनी पावडर दह्यात मिसळणे हे एक स्वादिष्ट आणि फायदेशीर असू शकते. दही प्रो-बायोटिक्स देत, जे आतड्यांच्या आरोग्यास सहकार्य करते आणि योग्य हार्मोनल नियमनासाठी आतड्यांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

दही-दालचिनी तयार करण्याच्या दोन पाककृती खालीलप्रमाणे 

चविष्ट दही-दालचिनी कृती

साहित्य

१ कप साधे दही (दही)

१/२ टीस्पून दालचिनी (दालचिनी) पावडर

पर्यायी : गोडपणासाठी मध किंवा ताजी फळे वापरू शकता.

पद्धत

दालचिनी पावडर दह्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत मिसळा.

हवे असल्यास त्यात मध किंवा ताजी फळे घाला.

स्नॅक किंवा नाश्त्याचा भाग म्हणून या आहाराचे सेवन करा.

दही-दालचिनी स्मूदी

साहित्य

१ कप दही

१ सफरचंद (कापलेले)

१ टीस्पून दालचिनी

१ टीस्पून मध

पद्धत

कापलेले सफरचंद, दही, दालचिनी पावडर व मध ब्लेंडरमध्ये घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.

स्मूदी एका ग्लासमध्ये घाला आणि नाश्ता किंवा संध्याकाळच्या ताज्या आहाराचा भाग म्हणून तुमच्या समृद्ध, स्वादिष्ट स्मूदीचा आनंद घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

1 तास ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

15 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

15 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

19 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

19 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

19 तास ago