महाराष्ट्र

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला.

वडेट्टीवार म्हणाले की, मीरा भाईंदरची ही जमीन मूळची राज्य शासनाची असताना शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अभिलेखात बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते, तरीही वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ रोजी केंद्र सरकारचे अपील फेटाळून जमीन ‘मीरा सॉल्ट वर्क्स’च्या मालकीची असल्याचे मान्य केले. सुनावणी अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावर सुरू असताना मालकी हक्काबाबत निर्णय खासगी कंपनीच्या बाजूने लागणे हे सरकारी वकिलांच्या आणि विधी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याची टीका त्यांनी केली. “सरकारी वकील झोपले होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना सरकारी जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, आता टीका झाल्यानंतर सरकारला जाग आली असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली जात आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत शासन काय करत होते? खासगी विकासकांचे हित जपण्यासाठीच ही प्रक्रिया लांबवली गेली का? असा सवाल त्यांनी केला.

ही २५४ एकर जमीन जनतेची संपत्ती असून ती खासगी विकासकांच्या हवाली होणे म्हणजे राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. मिठागराच्या जमिनींबाबत पुरावे असूनही न्यायालयात भक्कम भूमिका मांडण्यात शासन अपयशी ठरल्याने जमीन गमवावी लागल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळकाढूपणा केल्यास आम्हीही न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) पक्षाचे प्रवक्ते Vikas Lavande यांच्यावर आळंदीत झालेल्या शाईफेक प्रकरणाचाही वडेट्टीवार यांनी निषेध केला. वारकरी संप्रदायात हिंसक प्रवृत्तींची घुसखोरी झाल्याचा आरोप करत या भ्याड हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago