आरोग्य

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान

फणसात असणारे पोषकघटक

फणसामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय फणसात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलिक ऍसिड, थायमिन, यासारखी अनेक महत्वाची पोषकद्रव्ये असतात.

फणस खाण्याचे फायदे

फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कैंसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात, असे फायदे फणस खाण्यामुळे होतात.

फणसाचे फायदे

फणासातून महत्वाची अँटीऑक्सिडंट्स मिळतात.

फणसात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कैंसर, हृदयविकार, टाइप-2 डायबेटीस आणि डोळ्यांच्या मोतीबिंदूसारख्या समस्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

फणसात फायबरचे मुबलक प्रमाण असते..

फणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने ज्यांना कॉन्स्टिपॅशनचा किंवा पोट साफ न होणे याचा त्रास आहे त्यांनी फणसाची भाजी किंवा फणसाचे गरे आवर्जून खावेत.

फणस खाणे अल्सरमध्ये उपयुक्त असते.

अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी फणस जरूर खावा. यात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत होते.

फणस डायबेटीसमध्येही फायदेशीर असतो.

फणस गोड असूनही इतर फळांच्या तुलनेत फणसाचे पचन हळूहळू होत असते. त्यामुळे इतर फळांच्या तुलनेत फणस खाल्याने एकाएकी ब्लडशुगर वाढत नाही. म्हणूनच फणसाचा glycemic index (GI) हा अतिशय कमी असल्याने फणस हा डायबेटीसमध्ये फायदेशीर असतो. याशिवाय यात असणाऱ्या फायबर्समुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते.

फणस खाल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो

ज्यांना हाय बीपीचा जाम आहे त्यांच्यासाठी फणस खाणे उपयुक्त आहे. कारण फणसात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

फणस हा हृदयासाठी उपयुक्त आहे.

फणसातील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.

फणसामुळे हिमोग्लोबिन वाढते

हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस जरूर खावा. कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे ऍनिमिया, अशक्तपणा व थकवा दूर होण्यास मदत होते.

फणस हाडांसाठी उपयुक्त आहे.

फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.

फणस मसल्ससाठी फायदेशीर असतो.

फणसात प्रोटीन्ससुद्धा भरपूर असते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.

गरोदरपणात फणस खावे

फणसात व्हिटॅमिन्स, खनिजतत्वे व अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. तरीही प्रेग्नन्सीमध्ये थोड्या प्रमाणातचं फणस खावा. गर्भावस्थेत अधिक प्रमाणात फणस खाल्यास पोट बिघडू शकते.

फणस खाण्यमुळे होणारे तोटे

फणस खाणे हे फारसे काही आरोग्यासाठी नुकसानकारक नसते. काहीजणांना फणस खाण्यामुळे ऍलर्जीची समस्या होऊ शकते. याशिवाय फणस अधिक खाण्यामुळे काहीजणांचे अपचन होऊन पोट बिघडू शकते. त्यामुळे जुलाब व पोटफुगी होणे अशा समस्या होऊ शकतात. फणस खाण्यामुळे पोट फुगल्यास लिंबूपाणी प्यावे. असे काही नुकसान फणस खाण्यामुळे होऊ शकतात.

फणस खाल्यावर काय खाऊ नये…

फणस अधिक खाण्यामुळे अपचन होऊ शकते, त्यामुळे फणस हा जेवणानंतर खाणे टाळावे. तसेच कधीही फणस खाऊन नागवेलीचे पान म्हणजेद विड्याचे पान खाऊ नये, कारण फणसाचे गरे खाल्यावर विड्याचे पान खाल्यास होऊ शकतो. याशिवाय फणस हा खीर व दुधाबरोबर कधीही खाऊ नये.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago