एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. अनेकदा ‘रक्तदान हे सर्वात मोठे दान’ असे सांगत रक्त डोनेट करण्यासाठी आवाहन ही करण्यात येते. अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजूनही कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱ्याचा जीव वाचतोच, पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो.
Blood Donation म्हणून इंग्रजीत याला अधिक ओळख आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार केवळ ३७ टक्के लोकच भारतात रक्तदान करतात. बऱ्याच लोकांना याबाबत फायद्यांची माहितीच नाही. रक्तदानाचा नक्की काय फायदा होतो ते घ्या जाणून.
वजन कमी करण्यास होते मदत
तुमचे वजन जास्त वाढले असेल, तर रक्तदान करण्याने यामध्ये फरक पडतो. अर्थात वजन कमी करणे हे मुख्य नियमांमध्ये बसत नाही. पण रक्तदान केल्याने वजन कमी करण्यासह सहनशक्ती ही वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा मिळतो.
रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळतो फायदा
पूर्ण शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वृद्धी होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे आहे.
हृदयरोगाचा धोका होतो कमी
नियमित रक्तदान केल्याने शरीरातील Iron Level नियंत्रित राहाते. रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असेल तर नसांना ब्लॉक करते आणि यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तसंच हेमोक्रोमॅटोसिस आजारही होऊ शकतो. रक्तदान केल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्य राहून हृदयरोगाचा धोका राहात नाही.
कॅन्सरचा धोका कमी
रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदान हा लोह कमी करण्याचा चांगला पर्याय आहे. म्हणजेच रक्तात लोह अधिक प्रमाणात साठू नये म्हणून रक्तदान करावे. रक्तात लोह जमा झाल्यास, ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असेल तर रक्तदान नियमित करावे.
मानसिक आरोग्यासाठी ही फायदेशीर
रक्तदानाचे शारीरिक अनेक फायदे आहेत, मात्र मानसिक फायदा अधिक आहे. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच सुखद अनुभूती येते. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचले आहेत ही भावनाच तुम्हाला आनंद देऊन जाते. हाच आनंद तुमच्या मानसिक स्थितीला संतुलित राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि रक्तदान करून तुम्ही अधिक मानसिकदृष्ट्या सक्षम होता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…