रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. येथे रक्ताचा कॅन्सर कशामुळे होतो, ब्लड कॅन्सरची कारणे, लक्षणे त्याचे प्रकार आणि उपचार अशी ब्लड कॅन्सर विषयी सर्व माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
ब्लड कॅन्सरचे प्रकार
ऍक्युट आणि क्रोनिक असे ब्लड कॅन्सरचे मुख्य दोन प्रकार आहेत, याशिवाय ल्यूकेमिया, लिंफोमा, मायलोमा असेही ब्लड कॅन्सरचे प्रकार होतात.
ब्लड कॅन्सर कसा होतो
आपल्या रक्तातील पेशींची सतत झीज होत असते व त्या पेशी मृत होऊन त्याठिकाणी नवीन पेशी निर्माण होत असतात, आपल्या शरीरात हाडांच्या पोकळीतील बोन मॅरोमध्ये रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या रक्तातील पांढऱ्या पेशींची (WBC) निर्मिती होत असते.
ब्लड कॅन्सरमध्ये हे बोन मॅरो व्यवस्थित कार्य करीत नाही त्यातून विकृत कॅन्सरजन्य पांढऱ्या पेशी निर्माण होत असतात. या विकृत झालेल्या पांढर्या पेशी मृत पावत नाही व त्या तशाच रक्तात साठत जातात. त्यामुळे ब्लड कॅन्सरमध्ये या विकृत पांढर्या पेशींची संख्या रक्तात वाढते. अशा प्रकारे रक्ताचा कर्करोग होत असतो.
रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार
ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कॅन्सरची स्टेजवर आणि रुग्णाची शारीरिक स्थिती विचारात घेऊन उपचार केले जातात. किमोथेरपी, रेडिएशन थेरेपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांट यासारखे उपचार ब्लड कॅन्सरमध्ये केले जातात.
१) किमोथेरपी: यामध्ये कँसरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी गोळ्यांच्या स्वरूपात किंवा इंजेक्शनमधून विशिष्ट औषधे दिली जातात ब्लड कॅन्सरच्या प्रकारानुसार एकचं औषध किंवा २-३ औषधे एकत्र करुन दिली जातील.
२) रेडिएशन थेरेपी: यामध्ये X-RAY किंवा त्यापेक्षा जास्त प्रखर ऊर्जा किरणे वापरून ब्लड कैंसरच्या पेशी नष्ट केल्या जातात.
३) स्टेम सेल प्रत्यारोपण: यामध्ये आधी कीमोथेरेपी किंवा रेडिएशन देऊन शरीरातील विकृत बोन मॅरोला नष्ट करतात त्यामुळे ब्लड कैंसरच्याही पेशी नष्ट होतात. त्यानंतर आपल्या शरीरातील स्वस्थ स्टेम सेल किंवा दुसऱ्याच्या शरीरातील (डोनर) स्टेम सेल आपल्या शरीरात ट्रान्सप्लांट केले जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…