आरोग्य

कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करण्याचे फायदे

१) पचन तंत्र सुधारत: हींगाचा जास्त फायदा पचन तंत्राला मिळतो. कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्याने अपचन, गॅस आणि पोटात जडपणा वाटणे या समस्या दूर होतात. तसेच अ‍ॅसिडिटीची समस्या देखील होत नाही. इतकंच नाही तर पोटातील सूजही याने कमी होते. ज्यांना नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण ठरतो.

2) गॅस्ट्रिक समस्या: ही समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. जर पोटात नेहमीच गॅस होत असेल किंवा सूज असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन करावं. या समस्या काही दिवसात दूर होतील. याने पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर निघतो.

३) उचकी रोखण्यास फायदेशीर: जर सतत उचक्या लागत असेल तर कोमट पाण्यात हींग टाकून सेवन केल्यास आराम मिळेल. हींगाच्या सेवनाने उचकी लगेच बंद होईल. कारण याने तंत्रिका तंत्र शांत होतं आणि घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो.

४) बद्धकोष्ठतेची समस्या: कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

५) थकवा आणि कमजोरी: जर सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास एनर्जी मिळेल आणि पोटाचं आरोग्य चांगलं राहील. पोटासंबंधी समस्या दूर राहिल्यास आजारांचा धोकाही कमी राहतो.

६) शरीरात रक्त वाढत: हींगात आयर्न भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात चिमूटभर हींग टाकून सेवन केल्यास हीमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि शरीरात रक्त वाढवतं.

७) हाय ब्लड प्रेशर कंट्रोल: हींगाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. याने ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या लवचिक होतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.

सेवन करण्याची पध्दत

कोमट पाण्यात चिमुटभर हींग टाका आणि चांगलं मिक्स करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल. सुरूवातीला हींगाच प्रमाण कमी ठेवा. हींग जास्त घ्याल तर समस्या होऊ शकते. हींगाचे अनेक फायदे असले तरी याच्या जास्त सेवनाने नुकसानही होऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

11 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

11 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

15 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

15 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

15 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

15 तास ago