वजन कमी होण्यास मदत
दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होते. याने एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. कारण यात कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्त होऊन खाऊ शकता.
शरीराचं तापमान होतं कमी
दक्षिण भारतात दही-भात जास्तप्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? याचं कारण म्हणजे तिथे वर्षभर गरम वातावरण असतं. दही-भात शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करतो. तुम्ही दही-भात कोणत्याही गरम जेवणानंतर खाऊन बघा तुम्हाला थंड वाटेल.
प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात
दह्याध्ये कॅल्शिअमसोबतच प्रोटीनचं प्रमाणही अधिक असतं. दही हे एक चांगल अॅंटीऑक्सीडेंटही आहे. त्यामुळे दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
पोटदुखीवर उपाय
भातात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे पोटाचं दुखणं दूर होतं. दही आणि भात खाल्याने मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो.
पचनक्रिया चांगली होते
दक्षिण भारतातील लोक दही-भात जेवणाच्या शेवटी खातात. कारण याने जेवण पचायला मदत होते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात ज्याने तुम्हाला जेवण पचायला सोपं जातं
रोगप्रतिकारशक्ती वाढते
दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे जितका जास्त दही-भात खाल त्याचा फायदा होईल.
तणावापासून मुक्ती
दही तुमचा तणाव दूर करतं. काही अभ्यासांनुसार,
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया तुमचा तणान
दूर करून तुम्हाला शांत करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…