आरोग्य

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तेच जर बडीशेपबाबत सांगायचं तर यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, एस्ट्रोगोल, फेनचोन आणि एथेनॉलसारखे गुण असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.

गूळ आणि बडीशेपचे फायदे 

१) पचनक्रिया सुधारते: जेवण केल्यानंतर छोटा गुळाचा तुकडा आणि बडीशेपचं केल्याने पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासही मदत मिळते.

२) संधिवात होईल दूर: संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी गूळ आणि बडीशेप खूप फायदेशीर ठरते. यातील गुणांमुळे संधिवातात होणारी वेदनाही दूर होते.

कसं कराल सेवन

तुम्ही जेवण झाल्यावर गूळ आणि बडीशेपचं सेवन असंच करू शकता. तसेच तुम्ही गूळ आणि बडीशेपचं चूर्णही तयार करू शकता. चूर्ण तयार करण्यासाठी बडीशेप, ओवा, वेलची बारीक करून घ्या. नंतर याचं तुम्ही दिवसा जेवणानंतर सेवन करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

12 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago