चपात्यांवर तूप लावल्यास त्याचा सुगंध संपूर्ण जेवणाला स्वादीष्ट बनवतो आणि तूप लावलेले पदार्थ खाल्ल्या नंतर पूर्ण थकवा काही क्षणात नाहीसा होतो. भारतीय स्वंयपाकघरात तूप फक्त चव वाढवण्या साठीच नाही तर परंपरा, आरोग्य आणि संस्कृती जपण्याची एक ओळख आहे. तूप खाल्ल्यानं त्वचा, केस चांगले राहण्यास मदत होते.
रात्रीच्या जेवणात तुपाचा समावेश केल्यास त्याचा सुगंध वाढतो आणि दिवसभराचा थकवा दूर होतो. भारतात तूप फक्त एक खाद्यपदार्थ नसून आपली संस्कृती, परंपरा आणि आरोग्याचा एक भाग आहे. तुपाला इंग्रजीत क्लॅरिफाईड बटर म्हणतात. लोणी मंद आचेवर गरम करून पाणी आणि दूधाचा अंश काढून तयार केले जाते. भारतीय संदर्भात याला तूप म्हणतात. हा शब्द संस्कृतातील घृत या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ शुद्ध तूप आहे.
तुपात ब्युटिरीक एसिड असते जे पचनक्रिया मजबूत बनवते. त्वचा आणि केसांसाठी योग्य ठरते. तुपात एंटी ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे त्वचा चांगली राहते आणि केस मजबूत होतात. तुपात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात, जे हृदयाच्या कार्यासाठी गुणकारी ठरतात. तुपात कोलिन असते, जे शरीराची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. तुपाचा वापर उच्च तापमानावर ठेवलेलं अन्न शिजवण्यासाठी केला जातो. कारण याचा स्मोक पॉईंट उच्च असतो.
एक चमचा तुपाचे सेवन रोज केल्यास विशेषत: सकाळी रिकाम्यापोटी किंवा उपाशी पोटी केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. तुपाचा वापर पूजेसाठी, दिवा लावण्यासाठीही केला जातो. तूप आतड्यांचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्टता, मूळव्याध यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तूप त्वचेला खोलवर मॉईश्चराईज करते आणि त्वचा हायड्रेट ठेवते. ज्यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहते. तूप खाल्ले की रूप येतं असं म्हटलं जातं, कारण तूप चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…