आरोग्य

लिंबाच्या पानांचे फायदे

खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकता.

महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखी मध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, आराम मिळेल.

ही पाने चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. याची छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करा. चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल.

कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. याची पाने वाटून पेस्ट बनवा. त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो.

केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.

पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा. पोटातील जंत मरतील. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे.

कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते.

पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.

याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago