आरोग्य

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही.

रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते.

नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. वारंवार अपुऱ्या झोपेमुळे मेंदूवरही ताण येतो, स्ट्रेस वाढतो. विस्मरणाचा त्रासही मागे लागण्याचा धोका असतोच.

त्यामुळेच झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना रात्री लवकर झोप येत नाही ते डोक्याला मालिश करतात. पण त्याने म्हणावा तसा फायदा होत नाही.

कारण आयुर्वेदानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या झोपेशी संबंधित जे पॉईंट किंवा बिंदू असतात ते तळपायामध्ये असतात.

त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला चोळून मसाज करा. हलक्या हाताने तळपाय दाबा. यामुळे ते पॉईंट व्यवस्थित दाबले जातील आणि पायातला रक्तपुरवठा वाढेल. याचा चांगला परिणाम तुमच्या झोपेवर दिसून येईल.

अंथरुणावर पडताच चटकन आणि शांत झोप लागेल. काही दिवस हा उपाय करून पाहा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago