आरोग्य

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे काम हे बैठ्या स्वरूपाचे असते. शेतात किंवा कष्टाचे काम करण्यापेक्षा बैठे काम बरे वाटत असले तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. यातही विशेषत: लठ्ठ व्यक्ती आणि व्यायाम न करणाऱ्यांना हा त्रास जाणवू शकतो. म्हणून व्यायाम करणे आणि बसण्याच्या पध्दतीकडे लक्ष देणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. कारण एकदा मणक्याच्या दुखण्याने डोके वर काढले की आपल्या हालचालीवर तर मर्यादा येतातच पण आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात.

मणक्याचे आजार

सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याची शक्यता अशते. डिस्क (मणक्या मधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्क मधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत नाही. त्याला डिस्क डिजनरेट होणे म्हणतात. त्यामुळे सांध्यावर ताण येतो आणि पाठदुखी सुरू होते.

मणका आणि पाठीच्या समस्यांची कारणे

व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पाठीत बाक काढून चालायची आणि बसायची सवय यामुळे मागच्या बाजूच्या सांध्यावर ताण येतो. अनेकदा टूव्हीलर किंवा चारचाकी चालवताना धक्के बसतात. बरेच दिवस हे दुखणे अंगावर काढले तर ही समस्या वाढत जाते आणि भविष्यता त्याचे विपरीत परीणाम दिसायला लागतात. शरीराची पोझिशन ताठ हवी, मानही ताठ असायला हवी. मोबाइलचा अतिवापर केल्याने टेक्स नेक सिंड्रोम होऊ शकतो. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर टाळायला हवा. दिवसातून किमान वेळ काढून काही ना काही व्यायाम नियमितपणे करायला हवा. दुचाकी किंवा चारचाकी चालविताना स्पीड ब्रेकरमुळे मणक्याला धक्के बसतात, त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.

कोणती काळजी घ्यायला हवी

बसताना चुकीच्या पध्दतीने बसू नये. बरेचदा कामाच्या नादात आपण तिरके, वाकडे बसतो. मात्र त्याने नंतर पाठ अवघडते.

खाली वाकून काही उचलताना किंवा वाकून चुकीच्या पद्धतीने जोर लावला तर पाठ दुखते.

लॅपटॉप किंवा टेबल खुर्चीची पोझिशन योग्य असेल तर ही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे आपली बसायची पद्धत योग्य आहे की नाही हे तपासावे.

अनेकदा चालताना पाय दुखतात. बॅक स्ट्रेन झाला असेल, सांध्यांना इजा झाली तर वळताना मान दुखते. खांद्याच्या वरचा भाग दुखतो, मुंग्या येतात. त्यामुळे नियमीतपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

19 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

4 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

4 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago