आरोग्य

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या मानसिक समस्यांपासूनही सुटका मिळते. सोबतच झोपेची क्वालिटीही सुधारते.

स्ट्रेस कंट्रोल होतो: धावणं, सायकल चालवणं, स्वीमिंग यांसारख्या फिजिकल अ‍ॅक्टिविटी मेंदुमध्ये एंडॉर्फिन आणि सेराटोनिन सारखे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स तणाव आणि चिंता कमी करतात. ज्यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहते. मनाला शांतता मिळते आणि संतुलन जाणवतं.

मेंदुची क्षमता वाढते: रोज फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यास मेंदुतील महत्वाचे भाग जसे की, हिपोकॅम्पस नवीन न्यूरॉन्स बनवण्याचं काम करतात. रिसर्चनुसार, रोज एखादी एक्सरसाईज केल्यास मेंदुची क्षमताही वाढते.

मूड चांगला होतो: एक्सरसाईज केल्यानं मेंदुमध्ये डोपामाइन, सेराटोनिन आणि नॉरएपिनफ्रिन सारखे न्यूरोट्रान्समीटरची लेव्हल वाढते. जे मानसिक आरोग्यासाठी गरजेचे असतात. याचा थेट प्रभाव तुमच्या मूडवर पडतो. तुम्हाला जास्त आनंदी आणि उत्साही वाढतं. तुमचा तणावही कमी होतो.

चांगली झोप: रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर झोपेची क्वालिटी सुधारण्यास मदत मिळते. फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यानं शरीर थकतं आणि त्यामुळे गाढ झोप येते.

डिप्रेशन आणि एंग्झायटी होईल कमी: एक्सरसाईजमुळे मेंटल हेल्थ चांगली राहण्यास खूप मदत मिळते. खासरून डिप्रेशन आणि एंग्झायटीच्या केसमध्ये. फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यास शरीरात तणाव कमी करणारे केमिकल्स वाढतात. ज्यामुळे डिप्रेशन, चिंता दूर होते.

कामावर फोकस वाढतो: जेव्हा तुम्ही एखादी फिजिकल अ‍ॅक्टिविटी करता, तेव्हा शरीर आणि मेंदू दोन्ही अ‍ॅक्टिव असतात. यामुळे मानसिक आरोग्यात सुधारणा होते, ज्यामुळे अधिक लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते. अशात तुम्ही तुमची कामं अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago