आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ही समस्या असते. पोट जर साफ झालं नाही तर पोटात दुखणं, पोट फुगणं, अॅसिडिटी अशा समस्या होतात. अशात पोट साफ होण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
१) लिंबू आणि मध: लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तेच मध बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोटाला आराम देतं. एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाका. हे पाणी रात्री झोपण्याआधी प्या. यानं पचन तंत्र अॅक्टिव राहतं.
२) जिरे पावडर: जिऱ्याचा वापर वेगवेगळ्या उपचारांमध्ये केला जातो. जिऱ्यानं पोटातील सूज आणि गॅस कमी करण्यास मदत मिळते. तसेच जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते. अर्धा चमचा जिरे पावडर एक ग्लास कोमट पाण्यात रात्री झोपण्याआधी प्या. सकाळी पोट लगेच साफ होईल.
३) त्रिफळा चूर्ण: आयुर्वेदात त्रिफळा चुर्णाला पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय मानलं आहे. या चुर्णानं आतड्या हेल्दी राहतात. एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास सकाळी पोट सहज साफ होईल.
४) अॅपल व्हिनेगर: अॅपल सायडर व्हिनेगरनं आतड्यांची सफाई होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्या.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…