आरोग्य

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी आपण मुखवास, बडीशेप, गोड पानं असे अनेक इन्स्टंट रिफ्रेशमेंट देणारे पदार्थ खातो. पण जर याऐवजी आपण जेवल्यानंतर फक्त एक छोटीशी हिरवी वेलची चावून खाण्याची सवय लावली, तर ते आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते. सगळ्या खड्या मसाल्यांच्या पदार्थांतील ही सुवासिक वेलची केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर पचनक्रिया सुधारण्यापासून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंत अनेक शारीरिक समस्यांवर रामबाण उपाय ठरते. आकाराने अगदी छोटी असली तरी वेलचीचा सुगंध, चव आणि तिचा पारंपरिक वापर अनेक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघराचा भाग आहे. चहा, मिठाई, खीर किंवा विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची जेवणानंतरही अनेक घरांमध्ये खाल्ली जाते.

जेवणानंतर वेलची चावून खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. तिच्या सुगंधामुळे तोंडाला फ्रेशनेस मिळतो, पण त्यापलीकडेही वेलचीमध्ये काही नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणांत असतात. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाण्यामुळे पचनाशी संबंधित काही त्रासांमध्ये मदत होऊ शकते. मग रात्री जेवल्यानंतर एक छोटीशी हिरवी वेलची चावून खाल्ल्याने नेमकं शरीरावर काय परिणाम होतो? त्याचे कोणते फायदे होऊ शकतात आणि वेलची खाण्याची योग्य पद्धत कोणती? ते पाहूयात…

रात्रीच्या जेवणानंतर हिरवीगार वेलची चावून खाण्याचे फायदे… 

१) तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत :- रात्रीच्या वेळी खाल्लेल्या अन्नामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते, अशावेळी वेलची चावून खाल्ल्यास तोंडात फ्रेशनेस राहतो आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो. वेलचीचा सुगंध आणि तिच्यातील नैसर्गिक घटक जेवणानंतर तोंडाला फ्रेशनेस देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जेवणाचा वास कमी जाणवतो.

२) घशाला ताजेपणा मिळण्यास मदत :- जर तुम्ही रोज एक छोटीशी हिरवी वेलची चावून खात असाल, तर घशाला ताजेपणा जाणवू शकतो. जेवणानंतर एक छोटी वेलची हळूहळू चावून खाल्ल्याने तोंड आणि घशात फ्रेशनेस जाणवण्यास मदत होऊ शकते.

३) अन्न पचायला मदत करते :- वेलचीमधील सुवासिक तेल पाचक रसांच्या निर्मितला मदत करते, ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर आणि सहज पचते. जेवणानंतर वेलची चावून खाल्ल्याने पचनाशी संबंधित अस्वस्थता कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. पारंपरिक पद्धतीनेही वेलचीचा वापर पचनासाठी केला जातो.

४) पचनक्रिया सुधारते :- जेवणानंतर वेलची खाल्ल्याने गॅस, अपचन, पोटदुखी आणि ॲसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. काही लोकांना जेवल्यानंतर गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं. अशावेळी वेलचीसारख्या सुगंधी मसाल्यांचा वापर आराम मिळवण्यासाठी केला जातो.

५) वजन नियंत्रित ठेवण्यास मदत :- वेलची चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान करते, ज्यामुळे शरीरातील चरबी जाळण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

६) रक्ताभिसरण सुधारते :- वेलचीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

७) तणाव कमी करून चांगली झोप लागते :- वेलचीचा सुवास आणि तिचे गुणधर्म मनाला शांत करतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होऊन रात्री गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

8) तोंडातील लाळेचं प्रमाण वाढण्यास मदत :- वेलची चघळताना तोंडातील लाळ तयार होण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर तोंड कोरडं वाटत असल्यास फ्रेशनेस मिळवण्यास वेलची अतिशय फायदेशीर ठरते.

९) गोड खाण्याची इच्छा होईल कमी :- दररोज रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी काहीजणांना काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग) होत असेल, तर वेलची खाल्ल्याने याचे प्रमाण कमी होऊ शकते. तोंडाला वेलचीची हलकी गोड आणि सुवासिक चव लागताच जिभेवर एका वेगळीच चव रेंगाळत राहाते आणि यामुळेच जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

1 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

1 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

2 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

2 तास ago

वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या…

2 तास ago