आरोग्य

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक हृदयरोग होऊ नये आणि हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काळजी घ्यायला लागले आहेत. तुम्हालाही हा धोका टाळायचा असेल तर नाश्त्याआधी काही सोप्या सवयी लावाव्या लागतील. या सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका तर कमी होईलच सोबतच पूर्ण शरीराला फायदे मिळतील.

सकाळची वेळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. सकाळी झोपेतून उठल्यावर काही हेल्दी गोष्टी केल्यास दिवसभर एनर्जी राहते आणि आरोग्यही चांगलं राहतं. या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर, कोलेस्टेलॉल आणि ब्लड शुगरही कंट्रोल राहते. चला जाणून घेऊन नाश्त्याआधीच्या ५ हेल्दी सवयी.

१) २ ग्लास पाणी…

सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. असं केल्यास शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतील आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल. रोज सकाळी २ ग्लास पाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. या सवयीमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

२) उन्हात बसा…

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यानं शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं. ज्यामुळं हाडं तर मजबूत होतातच, सोबतच आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोकाही कमी होतो. व्हिटॅमिन डी मुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत मिळते. काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यास हृदयरोगांचा धोका वाढतो. तसेच इतरही अनेक समस्या होतात. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान १० ते १५ मिनिटं बसावं.

३) अर्धा तास फोन बघू नका…

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या फोन चेक करण्याची अनेकांना वाईट सवय असते. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, असं केल्यास मानसिक ताण वाढतो. दिवसाची सुरूवात डिजिटल डिटॉक्स करून केली तर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि सोबतच हृदयासाठीही फायदेशीर ठरेल. सकाळी रिलॅक्स रहा आणि काही मिनिटं ब्रीदिंग एक्सरसाईज करा. यानं स्ट्रेस हार्मोन कमी होतील आणि हृदय निरोगी राहील.

४) शरीर अ‍ॅक्टिव ठेवा…

सकाळी हलकी एक्सरसाईज, योगा किंवा वॉक केल्यास हृदय निरोगी ठेवता येऊ शकतं. असं केल्यास ब्लड फ्लो वाढतो, कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते आणि हृदयाची काम करण्याची क्षमता सुधारते. रोज कमीत कमी ३० मिनिटं फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यास हार्ट अटॅकचा धोका ३० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो.

५) पौष्टिक नाश्ता…

दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्यानं करणं फार महत्वाचं असतं. मोड आलेले कडधान्य, फळं, नट्स आणि प्रोटीन भरपूर असलेल्या नाश्त्यानं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. सोबतच हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. सकाळी नाश्त्यात तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका. यामुळे कोलेस्टेरॉल वाढेल आणि सोबतच हृदयरोगाचा धोकाही वाढेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago