आरोग्य

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ लागते. यामुळे तुम्हाला दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. व्हिटॅमिन्सची आणि मिनिरल्सच्या असंतुलनामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. असे अनेक व्हिटॅमिन्स आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते.

व्हिटॅमिन डी

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतं तेव्हा झोपेचा त्रास होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते. जेव्हा व्हिटॅमिन डी कमी असतं तेव्हा शरीरात कॅल्शियम-फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे हाडांमध्ये वेदना होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळस जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील जास्त झोप येण्याचे एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा व्हिटॅमिन बी १२ कमी असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप झोप येऊ लागते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्यांचा धोका वाढतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, शरीरात व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला आळशी वाटतं. तुम्हाला दिवसभर झोप येते. म्हणून, व्हिटॅमिन बी १२ समृद्ध आहार घ्या. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ कमी असते. केवळ व्हिटॅमिन डी आणि बी१२च नाही तर इतर अनेक पोषक घटक झोपेच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न सारख्या मिनरल्सचा समावेश आहे. त्यांच्या कमतरतेमुळे शरीरात आळस, थकवा आणि अशक्तपणा येतो. यामुळे तुम्हाला दिवसभर झोप येते. जर तुम्हाला बराच काळ असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का

उष्णकटिबंधीय, उपोष्णकटिबंधीय ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची लागवड कर्नाटक, आंध्र, तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंग्यू, मलेरिया, कावीळसारख्या विषाणूजन्य आजारांत पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी या फळाची अनेकांकडून शिफारस केली जाते.

पेशी वाढविण्यास मदत

पांढऱ्या पेशी वाढवते. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, ड्रॅगन फ्रूट पांढऱ्या पेशींची संख्या वाढवण्यास मदत करू शकते.

व्हिएतनामच्या फळाचा दर जास्त

व्हिएतनाममध्ये ड्रॅगन फ्रुटची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि तेथील हवामान या फळाच्या वाढीसाठी अनुकूल आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

2 तास ago

अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…

2 तास ago

धुराची आग लावणाऱ्यांनाच आता धुराची अॅलर्जी!

मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…

3 तास ago

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

18 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

21 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

2 दिवस ago