आरोग्य

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत! ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल.

खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत नाही. त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे हा त्रास टाळण्यासाठी एक खास पदार्थ रोज घरातल्या सगळ्यांनीच खायला पाहिजे अगदी लहान मुलांनीही तो खायला पाहिजे.

सांधेदुखी, हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी उपाय

तीळ खाण्याची योग्य पद्धत

डॉक्टर सांगतात की पुढे सांगितलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार तीळ खाल्ले तरी तुमच्या आरोग्याला भरपूर फायदे होतील.

1) तीळ थोडेसे भाजून एका बरणीत ठेवा आणि दररोज सकाळी एक चमचा खा.

2) जर तुम्हाला नुसतेच भाजलेले तीळ खायला आवडत नसेल तर लसूण, लाल तिखट, जिरे घालून तिळाची खमंग चटणी करा आणि ही १ चमचा चटणी दररोज जेवणात तोंडी लावा.

3) जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर तीळ आणि गूळ घालून तिळाचे लाडू तयार करा किंवा चिक्की तयार करा आणि दररोज ती थोडी थोडी खा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago