आरोग्य

दातांना खालून किड लागली? १ चुटकी मिठासोबत हा पदार्थ दातांना लावा, लगेच निघेल बाहेर किड

दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे दातांच्या सर्वाधिक समस्या उद्भवतात. दात किडले असतील आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले त्रास अधिक वाढत जातो. दातांमध्ये वेदना होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, दात पिवळे पडणं, तोंडातून दुर्गंध येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा स्थितीत दातांची किड आणि कॅव्हिटीजपासून तुम्ही त्रस्त असाल तर काही पदार्थांचा टिथ केअर रूटीनमध्ये समावेश करून दातांची किड आणि पिवळेपणा सहज दूर करू शकता. या पदार्थांच्या वापराचा कमालीचा परिणाम दातांवर दिसून येतो.

बेकिंग सोडा, व्हिनेगर, यांसारखी उत्पादनं दात स्वच्छ करण्यासाठी उत्तम ठरतात हे अजूनही पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. दातांची कीड काढून टाकण्यासाठी नियमित दातांची तपासणी करा. फ्लोराईट टुथपेस्टनं दिवसांतून दोनवेळा दात घासा. दात स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंग किंवा इंटरडेंटर ब्रश वापरा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दंत वैद्यांना नियमित भेटा. कमी साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

दातांची किड काढून टाकण्याचे उपाय

१) लसूण: दातांची किड कमी करण्यासाठी आणि या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. दातांची किड लसणाच्या एंटीबायोटीक आणि एंटी इफ्लेमेटरी गुणांमुळे कमालीचा परिणाम दाखवतात. यामुळे इन्फेक्शन कमी होते. लसूण बारीक करून त्यात मीठ मिसळा नंतर ही पेस्ट दातांना काहीवेळासाठी लावून ठेवा नंतर तोंड स्वच्छ पाण्यानं धुवा.

२) लवंगाचे तेल: फक्त लसूणंच नाही तर लवंगाचे तेल सुद्धा दातांची किड रोखण्याचे काम करते. एनेस्थेटिक आणि एंटी बॅक्टेरिअल गुणांमुळे लवंगाचे तेल नर्व्हसना आराम देतं. मांसपेशी काही वेळासाठी सुन्न करते. ज्यामुळे दात दुखीच्या वेदनांपासून त्वरीत आराम मिळतो.

३) मीठाचे पाणी: नॅच्युरल एंटीसेप्टीकप्रमाणे मीठाचे पाणी तुम्ही वापरू शकता. मीठाचे पाणी दातांची किड दूर करते. सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा भरून मीठ घाला नंतर या पाण्याने काहीवेळानं गुळण्या करा. ज्यामुळे दातांची चांगली सफाई होईल आणि दातांची किड कमी होण्यास मदत होईल.

४) हळदीची पेस्ट: दातांची किड दूर करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीची पेस्ट तयार करण्यासाठी थोडी हळद पाण्यात किंवा मोहोरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट वापरून दात स्वच्छ करा. एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे दात स्वच्छ होतात आणि किड निघून जाण्यास मदत होते. औषधी गुणांनी परीपूर्ण हळद वेदना कमी करण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

5 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

6 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

6 दिवस ago