क्राईम

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे.

स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला होता. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त, स्थानिक नागरिकांची मदत दत्ता गाडे याला पकडण्यासाठी घेण्यात आली.

युवतीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.

२५० पोलिसांचा फौजफाटा…
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची तब्बल १३ पथके रवाना करण्यात आली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबविला. मात्र, गावात ये-जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर २४ तास नाकाबंदी सुरू होती. सुमारे २५० पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिणींसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.

रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आला आणि अडकला. आल्यानंतर, मला पश्चाताप होतोय, मला सरेंडर व्हायचं आहे, असे बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले.

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

2 तास ago

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

16 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

17 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

17 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

19 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

20 तास ago