आरोग्य

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका

बदलती लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी फार घातक असते. याची पुढची स्टेज हार्ट अटॅक असते. ज्यात व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीर काही खास संकेत देऊ लागतं. अशा स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो. त्यासोबतच पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याचीही इच्छा होते. स्कीन इन्फेक्शन, धुसर दिसणे, ब्लॅडर इन्फेक्शन होणे, अचानक वजन कमी होणे, हे सगळे या गोष्टीचे संकेत आहेत की, तुमच्या ब्लडमध्ये शुगर लेव्हल हाय होत आहे. जी तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज आहे.

डायबिटीस वाढण्याची कारण

मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, ब्लड शुगर हाय होणं कुणासाठीही जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणंच चांगलं ठरतं. शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढण्याच्या कारणांमध्ये डिहाइड्रेशन, शारीरिक व्यायामाची कमतरता, जास्त खाणं, मानसिक तणाव, डायबिटीसची औषधं घ्यायला विसरणं किंवा एखा जुना आजार यांचा समावेश आहे.

ब्लड शुगर कशी कंट्रोल कराल

जर तुम्हाला शरीरात ब्लड शुगर हाय होताना दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. नेहमी सोबत डायबिटीस कंट्रोल करणारी औषधं ठेवा. जर रात्री तुमची शुगर वाढली आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कुणालातरी सोबत घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जावे.

आणखी एक कारण

जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात लालरक्त पेशी निर्माण होत नाहीत, तेव्हा एनीमियाची समस्या होऊ शकते. पुन्हा पुन्हा लघवी लागणे आणि घसा कोरडा पडणे याचं एक लक्षण असू शकतं. कमजोरी, अधिक थकवा जाणवणे, चक्कर येणे, हात आणि पायांना थंडी वाजणे, डोकेदुखी ही सुद्धा एनीमियाची लक्षणं आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago