आरोग्य

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? ‘या’ ३ पद्धतींनी खाऊन पहा…

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात, परंतु सॅलेड खाण्याचे अनेक फायदे असूनही आपल्यापैकी बऱ्याच जणांना सॅलेड खायला आवडत नाही.

सॅलेड म्हटलं की काहीजण नाकं मुरडतात, नकोच म्हणतात. सॅलेड करायचं म्हटलं की शक्यतो आपण सगळ्या कच्च्या भाज्याच कापून सॅलेड करतो किंवा काहीजण भाज्या हलके उकडवून घेतात. यामुळेच बऱ्याचजणांना असे कच्चे आणि चवीला बेचव लागणारे सॅलेड आवडत नाही. यासाठी, आपण सॅलेड नेमकं कोणत्या ३ वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो.

सॅलेड खायला आवडत नाही? मग या ३ वेगळ्या पद्धतीने सॅलेड खाऊन पाहा… 

१) सॅलेड हलकेसे परतून घ्यावे: जर तुम्हांला कच्चे किंवा उकडवून तयार केलेलं सॅलेड खायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. आपण सॅलेड हलकेसे पॅनमध्ये परतवून मग खाऊ शकता. यासाठी सर्वात आधी तुमच्या आवडत्या भाज्यांचे सॅलेड तयार करून घ्यावं. मग थेट हे एका पॅनमध्ये घालूंन परतवून घ्यावे आणि मग खावे. यामुळे सॅलेड अगदी लवकर पचते याचबरोबर, ब्लोटिंग किंवा पोटदुखीची समस्या त्रास देत नाही. इतकेच नाही तर या पद्धतीने सॅलेड खाल्ल्याने त्यातील सगळी पोषणमूल्ये योग्य प्रकारे आणि सहजरित्या शरीरात शोषली जातात.

२) दही – मसाले घालून रायतं करा: कच्चे सॅलेड खायला आवडत नसेल तर आपण त्यात दही – मसाले घालून त्याच पौष्टिक रायतं करून खाऊ शकतो. यासाठी सर्वातआधी आपल्या आवडत्या भाज्या चिरुन त्यांचे बारीक तुकडे करा किंवा भाज्या किसून देखील घालू शकता. त्यानंतर यात घरी तयार केलेलं घट्ट – दाटसर दही घालावं. वरून आपण चाट – मसाला किंवा लाल तिखट देखील भुरभुरवून घालू शकता. अशाप्रकारे आपण सॅलेडमध्ये दही मिसळून त्याच रायतं करून देखील खाऊ शकता. दह्यामुळे सॅलेडचे पोषणमूल्य अधिक वाढते, दह्यातून प्रोबायोटिक्स देखील मिळतात.

३) व्हेजी डिप: सॅलेड खायला आवडत नसेल तर आपण त्याचे व्हेजी डिप तयार करून खाऊ शकतो. यासाठी सॅलेड आधी पॅनमध्ये हलकेसे परतून घ्यावे, त्यानंतर मिक्सरमध्ये हे परतून घेतलेलं सॅलेड आणि किंचित पाणी घालूंन त्याचे व्हेजी डिप तयार करून घ्यावे. हे व्हेजी डिप आपण चपाती किंवा भातासोबत अगदी सहजपणे खाऊ शकता. अशाप्रकारे जर तुम्हाला कच्चे सॅलेड खायला आवडत नसेल किंवा ब्लोटिंग पोटदुखीची समस्या सतावत असेल तर आपण या ३ नव्या पद्धतीने सॅलेड खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

18 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

1 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

2 दिवस ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

2 दिवस ago