उष्णतेच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागात पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण दररोज किती पाणी प्यावं आणि त्याच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
उन्हाळ्यात शरीरातून घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतं, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. म्हणून पाणी पित राहावं. पाण्याची गरज व्यक्तीनुसार त्यांच्या शरीरानुसार बदलू शकते. परंतु साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात एका व्यक्तीला दिवसाला ८ ग्लास म्हणजे सुमारे ३ ते ३.५ लीटर पाण्याची आवश्यकता असते.
डिहायड्रेशन: घामाद्वारे शरीरातून जास्त पाणी बाहेर पडल्यास डिहायड्रेशन होऊ शकतं. त्याची लक्षणं म्हणजे डोकेदुखी, चक्कर येणं, अशक्तपणा आणि जास्त तहान लागणं.
हीट स्ट्रोक: उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रणाबाहेर जातं, ज्यामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढतो. ही एक गंभीर स्थिती असू शकते, ज्यामध्ये तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता.
बद्धकोष्ठता आणि पचन समस्या: पाण्याअभावी पचनसंस्थेची गती मंदावते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनसंस्था चांगली कार्य करते.
त्वचेच्या समस्या: कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू शकते. त्यामुळे त्वचेची चमक कमी होते. पाणी त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यास मदत करतं म्हणून पाणी प्या. जर तुम्ही बराच वेळ बाहेर राहत असाल, जास्त काम करत असाल किंवा खूप व्यायाम केलात तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा रस देखील घेऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…